VISION :-

  • To make students knowledgeable and rational.
  • Enable them to achieve career opportunities.

MISSION :-

  • Create interest in Marathi language and literature among students.
  • Provide them quality education and skills training.
  • Teach various genre of literature, literary isms, forms, history of Marathi literature, language and grammar, dialects of Marathi, Marathi language and information technology etc.
  • Improve aesthetic sense, analytical and research skill.
  • Help to improve rational thinking through study of literature.
  • Organize various activities to improve communication skill, oratory skill, writing skill etc.
  • Raise awareness about opportunities in media, creative writing, entertainment channels, advertising, translation, competitive exams, and related fields.
  • Make aware of political, socio-economic and environmental issues and its impact on society and Marathi literature.
  • Make aware of threats to the Marathi language in the globalization era and their responsibility to preserve the language.

Ms. Asha D. Kumbhar

महर्षी दयानंद महाविद्यालयातील मराठी विभागााची स्थापना १९६३ साली झाली आहे. कवयित्री शांताबाई शेळके, कवी, प्रा. केशव मेश्राम, कथाकार मोहिनी वर्दे यांनी या विभागात अध्यापनाचे कार्य निरलसतेने, निष्ठेने करून हा विभाग नावारूपाला आणला. १९९१ पासून डॉ. गीता मांजरेकर यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून धुरा सांभाळली. विभागाच्या साहित्यकेंद्री परंपरेचे जतन करतानाच बदलत्या काळाच्या गरजा ओळखत त्यांनी मराठी भाषा व साहित्यविषयक अभिनव उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. विद्यार्थ्यांमधील श्रवण, भाषण, वाचन, संभाषण ही भाषिक कौशल्ये तसेच भाषांतर, पत्रकारिता, जाहिरात, ब्लॉगलेखन, सर्जनशील लेखन इत्यादी व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी स्पर्था, वाचन प्रेरणा उपक्रम, भाषांतर कौशल्य कार्यशाळा, कथासर्जन कार्यशाळा, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन असे विविध उपक्रम मराठी विभागाने राबवले आहेत.

मराठी भाषा व साहित्यविषयक अभ्यासक्रमाची अपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी रूजवणे, साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी व मूल्यमापन करण्यासाठी त्यांचा सैद्धांतिक पाया पक्का करणे ही असते. तसेच आधुनिक काळातील विविध विचारसरणींचा, सामाजिक व साहित्यविषयक चळवळींचा परिचय करून देत या विचारसरणींचे, चळवळींचे साहित्याच्या मूल्यमापनासाठी उपयोजन करण्याचा सराव त्यांना देणे, साहित्याचा इतिहास, विविध वाङ् मयीन प्रवृत्ती आणि प्रवाहांचा परिचय करून देणे, भाषाशास्त्र व व्याकरण, मराठीच्या विविध बोली यांचा परिचय करून देणे हाही अभ्यासक्रमाचा उद्देश असतो. २०२० पासून ऑनलाईन अध्यापनाचा अपरिहार्यपणे स्वीकार करावा लागल्यावर विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरत विद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्यविषयक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अद्ययावत ज्ञान देण्याचाही मराठी विभागाचा प्रयत्न राहिला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झाल्यानंतरही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या व्यावसायिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मराठी भाषा व माहिती तंत्रज्ञान, युनिकोड मराठी, शब्दांकन, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने निबंधलेखन व मुलाखत तंत्र असे विविधांगी शिक्षण देण्याचा प्रयत्न मराठी विभाग करत आहे. मराठी भाषा व साहित्य विषयाशी निगडीत सर्व उद्दिष्टे लक्षात घेऊनच मराठी विभागातील अध्यापक अध्यापन करत असतात.

साहित्य आणि भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांच्या मनात मानवी मूल्ये रूजवण्याचा मराठी विभागाचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांना सुज्ञ, अभ्यासू व विवेकी व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न असतो. त्याअनुषंगाने सांविधानिक मूल्यांचा परिचय करून देणे, संत साहित्यातील मानवी मूल्यांचा परिचय करून देणे, अंधश्रद्धा निर्मूलनविषयक उपक्रमांचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम मराठी विभाग सातत्याने राबवित आहे. मराठी भाषा व वाङ् मय मंडळाच्या माध्यमातून तज्ज्ञांची व्याख्याने, चित्रपट आणि नाटक दाखवणे, शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची मराठी विभागाची भूमिका असते. याशिवाय साहित्याच्या अभ्यासातून समकालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय प्रश्नांविषयीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न मराठी विभाग करत असतो.

विद्यार्थी सहभागही विभागाच्या प्रत्येक उपक्रमात आम्ही महत्वाचा मानतो. शब्दजत्रेचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, लेखक भेटी, निवेदन, सादरीकरण अशा सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांना पुढाकार घ्यायला आम्ही प्रवृत्त करत असतो. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित कथा व काव्यलेखन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासही विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतो. त्यापैकी निवडक लेखन विभागाच्या ‘प्रारंभ; या ई-वार्षिक अंकात प्रसिद्ध करून ते महाविद्यालयाच्या वेबसाईटवर सर्वांना वाचण्यासाठी खुले करतो.

या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून मराठी विभागातून शिकून पदवीधर झालेले काही विद्यार्थी आज शिक्षण, चित्रपट दिग्दर्शन, पत्रकारिता, विधीक्षेत्र, विविध सेवाक्षेत्रे तर काही खाजगी क्षेत्रातही कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Ms. Asha D. Kumbhar
H.O.D & Assistant Professor
M.A., NET
Ms.Jai Dilip Mhatre
Assistant Professor
M.A,NET (Marathi), Diploma in Mass Communication & Journalism
Ms.Vimukti Sanjay Jadhav
Assistant Professor
M.A , SET (Marathi)